उत्तर प्रदेशच्या तीन तरूणांनी एका ४२ वर्षीय महिलेला बेशुध्द करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तिला दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये फेकून देण्यात आले.
दक्षिण दिल्लीमध्ये १६ डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये एका २३ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सदर महिला जयपूरची राहणारी असून वृन्दावन परिसरामध्ये बलात्कार केल्यानंतर दक्षिण-पूर्व दिल्लीच्या कालकाजी भागात तिला फेकून देण्यात आले.
ही घटना रात्री जवळपास सव्वा नऊ वाजता घडली. त्यानंतर तेथून जाणा-या एका प्रवाशाने सदर महिलेला पाहिल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात फोन केला. पीड़िता महिला २२ डिसेंबरला वृन्दावन येथे गेली होती आणि काल (बुधवार) तेथून घरी परतत असताना ही घटना घडली.
संबंधित महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसविले व एका फ्लॅटमध्ये तिला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या फ्लॅटवर त्यापूर्वीच दोन लोक तेथे उपस्थित होते. तेथे या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला कालकाजी भागात गाडीतून फेकून दिले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
दिल्लीत ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; दक्षिण दिल्लीत फेकून दिले
उत्तर प्रदेशच्या तीन तरूणांनी एका ४२ वर्षीय महिलेला बेशुध्द करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तिला दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये फेकून देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सदर महिला जयपूरची राहणारी असून वृन्दावन परिसरामध्ये बलात्कार केल्यानंतर दक्षिण-पूर्व दिल्लीच्या कालकाजी भागात तिला फेकून देण्यात आले.
First published on: 27-12-2012 at 11:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman sedated gangraped dumped in south delhi