श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तशी नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस शास्त्रीय सल्ल्यांवरही भर देत आहे. या प्रकरणाच्या तपासात देशातील सर्वात मोठी विज्ञान प्रयोगशाळा एफएसएल आणि सीएफएसएलची मदत घेतली जात आहे. रक्ताचे नमूने जमा करण्यापासून आरोपी आफताबच्या ठिकाणांवर सापडलेल्या हाडांचा तपास केला जात आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांची लक्ष्य डीएनए रिपोर्टकडे लागले आहे. डीएनए रिपोर्टच आता या प्रकरणाची पुढील दिशा निश्चित करू शकते. अखेर डीएनए अॅनालिसीस काय असेत आणि कशाप्रकारे हे कोणत्याही प्रकरणाची पुढील दिशा ठरवते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DNA म्हणजे काय? –

‘डीएनए’चा अर्थ डी ऑक्सीराइबो न्युक्लिक अॅसिड (Deoxyribo nucleic acid) होतो. याचा शोधाचं श्रेय फ्रेडरिक मिशर यांना जाते. त्यांनी १८६९ मध्ये याचा शोध लावला होता. याच्या पहिल्या संरचनेची माहिती १९५३ मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी दिली. हे मनुष्य आणि प्रत्येक सजीवामध्ये आढळते. कोणत्या व्यक्तीच्या प्रत्येक पेशीत एकाच प्रकारचा डीएनए असतो. यावरून त्याच्या वंशावळीचीही माहिती मिळवता येते.

‘डीएनए’चा नमुना कसा घेतला जातो? –

कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करत असताना आवश्यकता भासल्यास तपास यंत्रणा डीएनए नमुने घेते. खासकरून बलात्कार आणि हत्या अशा गुन्ह्यांच्या तपासात डीएनएन नमुन्यांची तपासणी केली जाते. याचे नमुने शरीराच्या कोणत्याही भागातून जसे रक्त, वीर्य, थुंकी, लघवी, विष्ठा, केस, दात, हाडे, उती आणि पेशी यातून घेता येतात.

श्रद्धा हत्याकांडाबाबत बोलायचे झाले तर पोलिसांनी तपासात काही हाडे जप्त केली आहेत. याशिवाय आफताबच्या घरातील बाथरुममधूनही रक्ताचे डाग सापडले आहेत. त्याची डीएनए चाचणी केली जात आहे. हे डीएनए घेतल्यानंतर ते श्रद्धाच्या आई-वडिलांच्या डीएनए नमुन्यांशी मिळवले जातील.

कपड्यांपासून ते नखांपर्यंत सर्वकाही महत्त्वाचे –

जेव्हा एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी पथक घटनास्थळी पोहचते. तेव्हा ते तेथून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात. जे की प्रकरणाची दिशा ठरवत असतात. डीएनए नमुने कपड्यांपासून शस्त्रे, नखं, रक्त, केस, अंर्तवस्त्र, पलंग, कप, बाटल्या, सिगारेटचे थोटके, टूथपिक, टूथब्रश आणि अगदी टाकून दिलेले रुमाल, कंगवा, चष्मा आणि कंडोमवरूनही डीएनए नमुना मिळवता येतो.

डीएनए नमुन्याची तपासणी कुठे होते? –

डीएनए परीक्षण ही एक किचकट प्रक्रिया आहे. हे सरकारी किंवा मान्यताप्राप्त फॉरेन्सिक लॅबमध्ये केले जाते. ही संपूर्ण प्रकिया अनेक टप्प्यांत पूर्ण होते. यामध्ये नमुन्यातून डीएनए काढण्यापासून संपूर्ण प्रोफाइळ तयार करण्यापर्यंतचा समावेश आहे. यानंतर ही प्रोफाइल आरोपी किंवा संशयितांच्या डीएनएशी जुळवली जाते आणि मग निष्कर्ष काढला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is dna who invented it how shraddha will play an important role in the investigation of the murder case msr
First published on: 25-11-2022 at 17:03 IST