Biscuits Modak Recipe: गणेशोत्सवाच्या दिवसांत बाप्पाच्या आवडीचे मोदकही आवर्जून बनवले जातात. उकडीच्या मोदकांसह नारळाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक अशा विविध प्रकारच्या मोदकांचा आस्वाद तुम्ही घेतला असेल. पण, आज आम्ही तुम्हाला बिस्किटांचे झटपट मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
बिस्कीट मोदकांसाठी लागणारे साहित्य:
- २ पॅकेट बिस्किटे (कोणतीही)
- दूध आवश्यकतेनुसार
- १/२ वाटी ड्रायफ्रुट्स
बिस्कीट मोदकांची कृती:
- सर्वांत आधी बिस्किटांचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये त्याचा चुरा करून घ्या.
- त्यानंतर हा चुरा एका भांड्यात घेऊन, त्यामध्ये थोडे दूध घालून एकत्र करून घ्या.
- आता त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घाला.
- तयार मिश्रण मोदकाच्या साचामध्ये घालून मोदक तयार करून घ्या.
- अशा प्रकारे तुम्ही बिस्किटांपासून मोदक तयार करू शकता.