Highest T20 Score by Baroda in SMAT: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा संघाने टी-२० मध्ये मोठा विक्रम रचला आहे. कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्याच्या या संघाने भारतीय भूमीवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंदूरमध्ये गुरुवारी सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात बडोदाने तब्बल ३४९ धावांचा डोंगर उभारला. फलंदाज भानू पानियाने ४२ चेंडूत झळकावलेल्या शतकामुळे बडोद्याने अवघ्या १७.२ षटकांत ३०० धावांचा टप्पा पार केला. यासह टी-२० मध्ये भारतीय भूमीवर एक मोठा विक्रम रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बडोदाचा संघ टी-२० डावात ३०० धावा करणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने सुरुवातीपासूनच तुफानी फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग राजपूत यांनी पाच षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. यानंतर अभिमन्यूने १७ चेंडूत ५३ धावा करून आपली विकेट गमावली.

हेही वाचा – ENG vs NZ: बेन स्टोक्सने पोस्ट शेअर करत ICC ला सुनावलं, WTC गुणतालिकेतील इंग्लंड-न्यूझीलंडचे कापले गुण; काय आहे नेमकं कारण?

IPL शिवाय टी-२० सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये १०० धावा करणारा बडोदा पहिला भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील संघ बनला. १० षटकांअखेर बडोद्याने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पनिया आणि सलामीवीर शिवालिक शर्मा यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे १८० धावांची मोठी धावसंख्या उभारली. बडोद्याने अवघ्या १०.३ षटकांत २०० धावांचा टप्पा पार केला. यासह, टी-२० इतिहासात सर्वात जलद २०० धावा करणारा संघ बनला आहे.

बडोद्याने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाने उभारलेली २९७/६ ही विक्रमी धावसंख्या अवघ्या काही षटकांत पार केली आणि एका डावात ३०० धावा करणारा केवळ तिसरा टी२० संघ बनला. ही कामगिरी करणारा बडोदा हा पहिला देशांतर्गत टी-२० संघ ठरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने गांबियाविरुद्ध ३४४/४ धावा केल्या होत्या तर २०२३ मध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्ध ३१४/३ धावा केल्या होत्या. टी-२० डावात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही बडोद्याच्या नावावर आहे.

हेही वाचा – IND vs AUS: पिंक बॉल कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच जाहीर केली प्लेईंग इलेव्हन, हेझलवुडच्या जागी कोणाला मिळाली संधी?

टी-२० च्या एका डावात सर्वात मोठी धावसंख्या उभारणार बडोदा पहिला संघ

टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता, ज्यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये झांबियाविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या. पण आता बडोदाचा संघ टी-२० सर्वात मोठ्या धावसंख्येच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

टी-२० मध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे संघ

बडोदा वि सिक्कीम – ३४९/५

झिम्बाब्वे वि गांबिया – ३४४/४

नेपाळ वि मंगोलिया – ३४१/३

भारत वि बांगलादेश – २९७/६

सनरायझर्स हैदराबाद वि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २८७/३

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baroda registers world record highest t20 team score in syed mushtaq ali trophy match against sikkim bdg