जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली कॅरोलिन मारिन कणखर प्रतिस्पर्धी आहे मात्र तिला नमवता येऊ शकते असा विश्वास भारताची फुलराणी सायना नेहवालने व्यक्त केला. ऑल इंग्लंड आणि नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कॅरोलिनने सायनावर मात केली होती. ‘ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी मी तीनवेळा कॅरोलिनवर विजय साकारला होता. तिच्याविरुद्ध दोनदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. ती डावखुरी खेळाडू आहे. मनगटाचा खुबीने उपयोग करत शैलीदार खेळ हे तिचे वैशिष्टय़ आहे. मात्र ती अजिंक्य नाही. तिला नमवण्याच्या क्लृप्त्या आहेत’, असे सायनाने सांगितले. ‘कॅरोलिनला रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र अतिउत्साहात माझ्याकडून चुका झाल्या. त्यामुळे दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. यापुढे सर्व चुका टाळून तिच्याविरुद्ध खेळेन. जपान सुपर सीरिज स्पर्धेत तिच्याविरुद्ध खेळावे लागल्यास, सर्वोत्तम कामगिरीसह जिंकण्याचा प्रयत्न करेन’, असे सायनाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2015 रोजी प्रकाशित
कॅरोलिनला नमवता येईल- सायना
ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी मी तीनवेळा कॅरोलिनवर विजय साकारला होता.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 05-09-2015 at 00:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carolina marin is a tough rival but can be beaten saina nehwal