सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम नावावर असलेला नेदरलॅण्ड्सचा महान खेळाडू टेऊन डी नूइजरचा खेळ भारतीय हॉकीरसिकांनी याचि देही याचि डोळा पाहता येणार आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये नूइजरसह नेदरलॅण्ड्सचे आठ खेळाडू सहभागी होणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीत ही स्पर्धा रंगणार आहे.
१९९४ साली पदार्पण केलेल्या नूइजरने विक्रमी ४५३ सामन्यांत नेदरलॅण्ड्सचे प्रतिनिधित्व केले. गेल्याच महिन्यात त्याने निवृत्ती स्वीकारली होती. त्याने चार ऑलिम्पिक तसेच तीन विश्वचषकांत नेदरलॅण्ड्सचे नेतृत्व केले. २००३, २००५ आणि २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड केली होती.
पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ तेइके तेकइमा या नेदरलण्ड्सच्या खेळाडूचाही लिलावात समावेश करण्यात आला आहे.
तेकइमाने २३९ सामन्यांत २२१ गोल केले आहेत. लंडन ऑलिम्पिकमध्ये नेदरलण्ड्सच्या रौप्यपदकविजेत्या संघाचे नेतृत्व करणारा फ्लोरिस इव्हर्सचाही लिलावात समावेश करण्यात आला आहे.
या तिघांबरोबरच वॉटूर जोली, मार्केल बालकेस्टिन, जेरोझोन हर्ट्झबर्गर, जाप स्टॉकमॅन, संदर बार्ट आणि टिम जेनिन्सकेन्स यांचाही लिलावामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dutch legend teun de nooijer set for hockey india league auction