Mohammed Siraj Harry Brook Fight Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना चांगलाच अटीतटीचा होत आहे. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. भारतीय संघाच्या खेळाडूंनी अनेक कॅच ड्रॉप केले आहेत, ज्याचा संघाला फटका बसत आहे. भारताकडे आता पहिल्या अवघ्या डावात अवघ्या काही धावांची आघाडी बाकी आहे. दरम्यान सिराज आणि हॅरी ब्रुक यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात बुमराहने हॅरी ब्रुकला एकही धाव घेण्याची संधी दिली नाही आणि त्याला बाऊन्सर टाकून त्रास दिला. बुमराहच्या एका बाऊन्सवर हॅरी ब्रुक झेलबाद झाला. पण पंचांनी बुमराहचा तो चेंडू नो बॉल दिला. याचा संघाला मोठा फटका बसला. आता हॅरी ब्रुक शतकाच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान ब्रुक मोठे फटके खेळत आहे.
पहिल्या दिवशी ब्रुकची विकेट घेण्यात भारताची चूक झाल्यानंतर संघ विकेट घेण्याच्या प्रतिक्षेत होता. तिसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतरच्या सत्रात ८४ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. या षटकात सिराज आणि ब्रुक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज आणि हॅरी ब्रुक यांच्यातील भांडणाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिराजच्या या षटकात सिराजने पाचवा चेंडू टाकला जो ब्रुक खेळायला चुकला आणि चेंडू स्लिपमध्ये गेला. ब्रुकला देखील कळलं नाही, चेंडू कुठे गेला. यानंतर सिराज ब्रुककडे एकटक पाहत राहिला आणि ब्रुकने त्याला हाताने जा जा असं इशारा करताना दिसला. एकदा नव्हे तर दोन तीन वेळेस ब्रुकने जा गोलंदाजी करत असं म्हणत सारखाच इशारा केला आणि यामुळे सिराज वैतागून त्याला काहीतरी बोलताना दिसला. यानंतर अखेरचा चेंडू टाकल्यानंतर हे षटक संपलं.
मोहम्मद सिराज या घटनेनंतर पुन्हा गोलंदाजी करायला आला, तेव्हा हॅरी ब्रुकने त्याची चांगलीच धुलाई केली. सिराजच्या षटकात ब्रुकने १८ धावा केल्या. या षटकात एक षटकार आणि दोन चौकार लगावत ब्रुकने सिराजची चांगलीच धुलाई केली. यानंतर हॅरी ब्रुक ९९ धावांवर प्रसिध कृष्णाच्या षटकात झेलबाद झाला. अवघ्या एका धावेने ब्रुकचं शतक हुकलं. इंग्लंडचा संघ भारताची आघाडी मोडून काढण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. ब्रुकनंतर ख्रिस वोक्स कमालीची फलंदाजी करत आहे.