WTC Final 2023 Live Streaming: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. टीम इंडिया ओव्हलवर ऑस्ट्रेलियाशी लढत आहे. गेल्या वर्षी भारताला न्यूझीलंडकडून निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर यंदा, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या द्विपक्षीय मालिकेदरम्यान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या लीग टेबलमध्ये १५२ गुण मिळवून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गाठलं आहे. तर १२७ गुण मिळवून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

WTC IND vs AUS भारतात ‘या’ ठिकाणी फ्री मध्ये पाहा

स्पर्धेचा अंतिम सामना, ज्याला ‘अल्टीमेट टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे, हा स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि डिस्ने+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जाईल. पण जर आपल्याकडे या दोन्हीचा ऍक्सेस नसेल तरी आपण मोफत हा सामना पाहू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सांगितल्याप्रमाणे फायनलचे प्रसारण सरकारी मालकीच्या, दूरदर्शनच्या ‘डीडी स्पोर्ट्स’ वर भारतात विनामूल्य होणार आहे.

“भारतात, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क इंग्रजी वर्ल्ड फीडचे प्रदर्शन करेल आणि हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगुमध्ये प्रादेशिक कव्हरेज प्रदान करेल. डिजिटल प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर प्रत्येक दिवसाच्या खेळाचे थेट कव्हरेज पाहायला मिळू शकते. दूरदर्शन देखील त्यांच्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलद्वारे प्रत्येक दिवसाच्या खेळाचे लाईव्ह कव्हरेज करणार आहे. आयसीसीने असेही सांगितले की फायनलचे प्रसारण जवळपास ७०० दशलक्ष जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भूतकाळात काही महान सामने झाले आहेत आणि हे दोन्ही संघ एकमेकांसाठी तगडे आव्हान ठरणार आहेत. आता या अंतिम टप्प्यात नक्की कोणाचं पारडं जड ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus wtc final 2023 free on this channel when and where to watch and live streaming of india vs australia match highlights svs