INDU19 vs SCOWU19 Highlights in Marathi: भारताच्या महिला संघाची अंडर १९ टी-२० महिला विश्वचषकात विजयी घोडदौड कायम आहे. सुपर सिक्स फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडचा एकतर्फी पराभव केला. भारतीय संघाने हा सामना तब्बल १५० धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २०८ धावांची मोठी विक्रमी धावसंख्या उभारली आणि प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ अवघ्या ५८ धावांत गारद झाला. यासह भारतीय संघाने १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली गोंगडी त्रिशा, जिने प्रथम ५९ चेंडूत ११० धावांची वादळी खेळी केली आणि त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला नेस्तानाबूत केलं.

भारतीय संघाने स्कॉटलंडचा अखेरच्या सुपर सिक्स सामन्यात एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सलामीवीर जी कामिलीनी आणि गोंगडी त्रिशा यांनी शतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची विक्रमी भागीदारी केली. कामिलिनीने ४२ चेंडूत ५१ धावा केल्या. मात्र त्रिशाने विस्फोटक फटकेबाजी करत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ११० धावा केल्या, ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात शतक झळकावणारी त्रिशा पहिली क्रिकेटपटू ठरली. तिच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत २०८ धावा केल्या, जी या स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या आहे.

२०९ धावांचे लक्ष्य समोर असताना स्कॉटलंडची फलंदाजी खूपच राहिली. डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी भेदक गोलंदाजी केली आणि दोघींनी मिळून १३ धावांत ७ विकेट गमावले. शेवटी शतक झळकावणाऱ्या त्रिशाने चेंडूनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि तीन विकेट्स घेतल्या आणि स्कॉटलंडसाठी कर्दनकाळ ठरली.

भारतीय संघाने स्कॉटलंडविरूद्धच्या विजयापूर्वीच सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी सर्व पाचही सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर यजमान मलेशियाचा १० गडी राखून पराभव केला. टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचाही ६० धावांनी पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw beat scotw by 150 runs in u19 womens t2o world cup super 6 matches gongadi trisha century bdg