जो रूटने पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवत शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे इंग्लंडने दुबईतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १८२ धावा केल्या. २ बाद १४ अशा कठीण स्थितीतून कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने (६५) रूटच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. खेळ थांबला, तेव्हा रूट ७६ आणि जॉन बेअरस्टो २७ धावांवर खेळत होते. रूटने ११८ चेंडूंत ९ चौकारांसह आपले १५वे अर्धशतक साकारले. त्याआधी पाकिस्तानचा पहिला डाव ३७८ धावांवर संपुष्टात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe root firm as england push pakistan