AUS vs SA, Temba Bavuma Memes: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २८२ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. हा विजय तेंबा बावूमासाठी अतिशय खास ठरला. कारण त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकाने पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
तेंबा बावूमा आणि मीम्स यांचं खूप जुनं नातं आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या फलंदाजीमुळे कमी आणि मीम्समुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. जॉन बनेगा डॉन ते लॉर्ड बावूमा असे अनेक मीम्स सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाले आहेत. मात्र, यावेळी ते दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल न करता त्याचं कौतुक केलं जात आहे.
तेंबा बावूमा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो
ज्यावेळी संघाला खूप जास्त गरज होती त्यावेळी तेंबा बावूमाने मैदानावर टिचून फलंदाजी केली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव स्वस्तात आटोपला. पण या डावात त्याने बहुमूल्य ३६ धावांची खेळी केली.
या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याने १३४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. ही खेळी या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. कारण त्याने मारक्रमसोबत मिळून विक्रमी भागीदारी केली.
भन्नाट मीम्स व्हायरल
दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. तर तेंबा बावूमाने ६६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.