ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २२४ धावांची खेळी साकारत सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय कर्णधाराच्या सर्वाधिक खेळीचा विक्रम यापूर्वी सचिनच्या नावावर होता. सचिनने कर्णधार असताना १९९९-२००० साली न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात २१७ धावांची खेळी साकारली होती. धोनीने सचिनचा विक्रम मोडीत काढला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधाराच्या सर्वाधिक खेळीचा अँडी फ्लॉवरचा विक्रम मात्र त्याला मोडता आला नाही. फ्लॉवरने कर्णधार असताना भारताविरुद्ध २३२ धावांची खेळी साकारली होती.
भारतीय कर्णधारांच्या सर्वोत्तम खेळी
धावा कर्णधार प्रतिस्पर्धी ठिकाण
२२४ महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलिया चेन्नई
२१७ सचिन तेंडुलकर न्यूझीलंड अहमदाबाद
२०५ सुनील गावस्कर वेस्ट इंडिज मुंबई
२०३ मन्सूर अली पतौडी इंग्लंड दिल्ली