Manu Bhaker Breaks Silence with Neeraj Chopra Marriage Rumors : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने नेमबाज मनू भाकेर व तिच्या आईची भेट घेतली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकेर लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. नीरज चोप्राने या चर्चेवर अजून काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, नेमबाज मनू भाकेरने या चर्चेवर शेवटी मौन सोडले असून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनूने स्वत: नीरज चोप्रा आणि ती लग्न करणार आहे की नाही? याबद्दल सांगितले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोपानंतर नीरज एका कार्यक्रमात दिसला, जिथे मनू आणि तिची आई देखील उपस्थित होती. मनू भाकेर, तिची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलत होते. यावरून मनू आणि नीरजच्या नात्यावर चर्चा सुरू झाली.मनू भाकेरची आई आणि नीरज चोप्रा एकमेकांशी संवाद साधत होते, तेव्हा तिच्या आईने नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवत त्याला काहीतरी मनवताना दिसल्या. तर काही वेळाने नीरज मनूशी गप्पा मारताना दिसला. जिथे तिची आईदेखील आजूबाजूला होती. मनूची आई आणि मनू नीरजसोबत व्हिडिओमध्ये बोलताना दिसल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर ‘रिश्ता पक्का’ अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या.
मनू भाकेरने सोडले मौन –
तेव्हापासूनच नीरज आणि मनूच्या नात्याची चर्चा सुरू असून दोघे लग्न करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर आता स्वत: मनू भाकेरने प्रतिक्रिया दिली. २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकच्या यशाबद्दल न्यूज १८ इंडियाशी सविस्तर संवाद साधला. यावेळी तिने लग्नाच्या चर्चेवरही प्रत्युत्तर दिले. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, ‘सोशल मीडियावर ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे, तसं माझ्यात आणि नीरजमध्ये काहीही नाही. तो मला सीनिअर आहे.’ मनू भाकेर १० आणि २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत खेळते. त्याचबरोर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे.
हेही वाचा – Sreejesh on Vinesh : ‘ती रौप्यपदकासाठी पात्र आहे पण खेळात नियम…’, विनेशबद्दल श्रीजेशचे मोठे वक्तव्य
पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकेर तीन महिन्यांचा ब्रेक घेत आहे. ती म्हणाली, ‘मी ब्रेकच्या वेळी व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेणार आहे. त्याचबरोबर कोणते तरी हॉर्स राइडिंगचे इन्स्टीट्युट जॉईन करेन. या स्टार नेमबाजने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदकावर नाव कोरले. ती पुढच्या वेळी चांगली कामगिरी करेल असे सांगितले. पुढील ऑलिम्पिक २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणार आहे.
हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकल्यानंतर मनू भाकेर मायदेशी पतल्यावर म्हणाली, “भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे.” अनेक पदकं भारताला मिळाली पाहिजेत असंही मत मनू भाकेरने व्यक्त केलं आहे. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं तिने जिंकली आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd