अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकविजेत्या राज्यवर्धन सिंग राठोडने ५६व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तरप्रदेशच्या मोहम्मद असाबने रौप्य तर रंजन सोधीने कांस्यपदक पटकावले. डबल ट्रॅप प्रकाराच्या कनिष्ठ प्रकारात दिल्लीच्या शायन मसूदने सुवर्णपदकावर नाव कोरले. रौप्यपदक हरयाणाच्या अंकुर मित्तलने तर कांस्यपदक अशर नोरियाने पटकावले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-12-2012 at 04:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National archary rajyavardhan got gold medel