Under-19 WC Super Six IND vs PAK: २०२४ च्या अंडर-19 विश्वचषकाच्या गट टप्प्याचा समारोप ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवरचा विजय आणि भारताचा USA विरुद्धच्या पराभवाने झाला, याचा अर्थ आता आपण स्पर्धेच्या सुपर सिक्स टप्प्यात पुढे जात आहोत. या स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि आयर्लंड अ गटातून पात्र ठरले आहेत तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज पुढील टप्प्यात पोहोचले. क गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे, तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे सुद्धा पात्र ठरले आहेत. गट ड मधून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळने पुढे जाण्याची संधी हेरली आहे. दरम्यान, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या टप्प्याच्या आधी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. कदाचित तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की आता विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना कधी होणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपर सिक्स टप्प्यात बारा संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली असून या प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिल्या फेरीतील गट अ आणि गट ड मधील प्रत्येकी तीन संघ सुपर सिक्स संघांमध्ये एक गट तयार करतील आणि इतर सहा संघ दुसरा बनतील.

सुपर सिक्स टप्प्यात कोणते सामने ठरतील महत्त्वाचे?

सुपर सिक्सच्या पहिल्या दिवशी भारताचा सामना न्यूझीलंडशी, श्रीलंका वेस्ट इंडिजशी आणि पाकिस्तानचा सामना आयर्लंडशी होणार आहे. बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. भारताचा दुसरा सामना शुक्रवारी नेपाळविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका-श्रीलंका आणि पाकिस्तान-बांग्लादेश हे सुद्धा ब्लॉकबस्टर सामने ठरू शकतात. आतापर्यंत मिळवलेले गुण आणि निव्वळ धावगती घेऊन भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान पुढे जाणार आहेत. हे तिन्ही संघ त्यांचे सर्व गट सामने जिंकून प्रत्येकी जास्तीत जास्त चार गुणांसह सुपर सिक्स टप्प्याची सुरुवात करणार आहेत.

हे ही वाचा<< U19 WC: अंडर १९ विश्वचषकातील ‘सुपर सिक्स’चे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कोणकोणत्या संघाविरुद्ध होणार?

आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही? भारत व पाकिस्तान दोघेही एकाच सुपर सिक्स गटात असले तरी विश्वचषकाच्या या टप्प्यावर दोन्ही संघ आमनेसामने येणार नाहीत. कारण, प्रत्येक संघ दोन संघांविरुद्ध दोन गेम खेळतो, हे सामने संघांच्या पॉईंटटेबलमधील स्थानानुसार ठरतात. ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आपापल्या गटात अव्वल असल्याने ते एकमेकांना सामोरे जाणार नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No ind vs pak in under 19 world cup super six look out for these blockbuster matches from today highlights of wc point table svs
First published on: 30-01-2024 at 09:55 IST