IND vs NZ Updates in Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नशीबाने पुन्हा एकदा नाणेफेकीच्या वेळेस नशीबाने साथ दिली नाही आणि रोहितने नाणेफेक गमावली. यासह रोहित शर्माने ब्रायन लारा यांच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत वि. न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार बनला आहे.

भारत वि. न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ब्रायन लाराने वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ १२ टॉस गमावले होते.

२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून भारतीय संघ नाणेफेक गमावत आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक १२ वेळा नाणेफेक गमावण्याचा लाजिरवाणा विश्वविक्रम केला होता. यापूर्वी हा विक्रम नेदरलँड्सच्या नावावर होता, या संघाने सलग ११ वेळा नाणेफेक गमावली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या गट सामन्यात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही टीम इंडियाला नाणेफेक जिंकता आली नाही. अशाप्रकारे सलग १५ वनडे सामन्यांमध्ये नाणेफेक गमावण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाणेफेक गमावणारा कर्णधार

रोहित शर्मा- १२
ब्रायन लारा – १२
पीटर बोरेन – ११

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे. मॅट हेन्री दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी नॅथन स्मिथचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma equals brian lara record of losing 12 tosses in a row ind vs nz champions trophy final bdg