तर ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या पी. कश्यप याने कारकीर्दीतले अव्वल स्थान गाठत ‘टॉप टेन’मध्ये प्रवेश केला आहे.
सायनाने ८००९१.७४ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी चीनची ली झुएरूई असून तिच्या खात्यात ९४६२६.७१ एवढे गुण आहेत.
लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत पोहोचून चमकदार खेळ करणाऱ्या कश्यपने ५१९८६.६९ गुणांसह दहावे स्थान पटकावले आहे. यापूर्वीच्या क्रमवारीत तो ११ व्या स्थानावर होता. पुरुषांच्या क्रमवारीत अव्वल २५ जणांच्या यादीत स्थान मिळवणारा कश्यप पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
युवा महिला खेळाडू पी.व्ही.सिंधूने ४३११६.८६ गुणांसह १६ वे स्थान पटकावले आहे. तर अजय जयराम या क्रमवारीत एका स्थानाने पिछाडीवर पडला असून तो ३७६९२.०० गुणांसह ३१ व्या स्थानावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina rises to world no 2 kashyap in top