पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत खेळू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानी संघाचे सामने मुंबईत आयोजित करू नका, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांना सांगितल्याचे समजते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘एमसीए ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आचारसंहितेनुसार कार्य करते. त्यामुळे याबाबतीत थेट बीसीसीआयशीच बोलावे, असे सावंत यांनी उद्धव यांना सांगितले आहे.’’ या स्पर्धेचे सामने वांद्रे-कुर्ला संकुल, एमआयजी क्रिकेट क्लब, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. पाकिस्तानी संघाचे सामने हे वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमसीएच्या मैदानावर होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाचे सामने मुंबईत आयोजित करू नका!
पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत खेळू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानी संघाचे सामने मुंबईत आयोजित करू नका, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांना सांगितल्याचे समजते.
First published on: 15-01-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena warne bcci not to organise pakistani women cricket match in mumbai