India Vs Australia Women Semi Final: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत हरला. भारताला ऑस्ट्रेलियाकडू ५ धावांनी पराभव पत्कारावा केला. ज्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पराभवानंतर भारतीय महिला संघातील बरेच खेळाडू भावूक झाले होत. त्यानंतर आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या एक ट्विट केले. ज्यामध्ये तिने आपल्या चाहत्यांना एक वचने दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले.प्रत्युत्तरात भारताने निर्धारित २० षटकांत ८ विकेट गमावून १६७ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ पराभूत झाला. आता टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

हरमनप्रीतने आपल्या पोस्टने चाहत्यांचे आभार मानले आणि आणखी मजबूत पुनरागमन करण्याचे आश्वासन दिले. हरमनप्रीतने ट्विटरवर लिहिले की, “हे आमच्या जगभरातील सर्व चाहत्यांसाठी आहे ,ज्यांनी या विश्वचषकादरम्यान आम्हाला पाठिंबा दिला. आमच्या प्रवासावर विश्वास दाखवल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. एक क्रिकेट चाहता म्हणून मला माहीत आहे की तुमचा संघ हरताना पाहून वाईट वाटते. पण मी एवढेच म्हणेन की आम्ही जोरदार पुनरागमन करू आणि चमकदार कामगिरी करू.”

विशेष म्हणजे उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने एकेकाळी सामन्यावर पकड मिळवली होती, मात्र हरमनप्रीतच्या धावबादमुळे संघाला धक्का बसला. पंधराव्या षटकात हरमनप्रीत दुसरी धाव घेताना बाद झाली. ती क्रीमध्ये पोहोचणार होती पण तिची बॅट खेळपट्टीवर अडकली आणि यष्टिरक्षक हीलीने चेंडू बेल्स उडवल्या.

हरमनप्रीतने स्वतः कबूल केले की ती धावबाद होणे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली, ती म्हणाली, “जेमिमासोबतच्या भागीदारीने आम्हाला लय मिळवून दिली. त्यानंतर आम्हाला हरण्याची अपेक्षा नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले, यापेक्षा दुर्दैवी दुसरे काहीही असू शकत नाही.”

हेही वाचा – PSL 2023: धक्कादायक! लाइव्ह सामन्यात बाबर आझम हसन अलीला मारण्यासाठी बॅट घेऊन धावला, पाहा VIDEO

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती, मात्र केवळ १० धावा झाल्या. या सामन्यात भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली. मात्र, हरमनप्रीत (३४ चेंडूत ५२) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (२४ चेंडूत ४३) यांनी शानदार खेळी खेळली. पण त्यांना टीम इंडियाला विजय मिळवून देता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skipper harmanpreet kaur said in a tweet that it was sad to see the loss in ind vs aus vbm