Asia Cup Final IND vs PAK Suryakumar yadav Kuldeep: भारत आणि पाकिस्तान यांच्यातीआशिया चषक अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीचं पुनरागमन केलं आहे. कुलदीप यादव पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार गोलंदाजा ठरला. कुलदीपने एका षटकात तीन विकेट्स घेतल्या. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने कुलदीप यादवच्या सामन्यातील या पुनरागमनात मोठी भूमिका बजावली.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यामध्ये पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५६ धावा केल्या. कुलदीप यादवविरूद्ध पहिल्या दोन षटकांत पाकिस्तानच्या फलंदाजांनी फटकेबाजी केली. पण नंतर कुलदीपने असं काही पुनरागमन केलं की पाकिस्तानच्या निम्म्या संघाला माघारी धाडलं.
कुलदीप यादवला पहिल्या दोन षटकांनंतर त्याला सूर्याने १३वे षटकं टाकण्यासाठी पुन्हा बोलावलं. पाकिस्तानने तोपर्यंत फक्त १ विकेट गमावली होती. कुलदीपने या षटकात वाई़ड चेंडू टाकले होते. यानंतर तिसऱ्या चेंडूवर कुलदीपच्या खांद्यावर सूर्यकुमार यादवने हात टाकला आणि त्याच्याशी पुढे जाताना चर्चा करत होता, त्याने कुलदीपला धीर दिला आणि नंतर कुलदीपने पाचव्या चेंडूवर सईम अयुबची विकेट घेतली. कुलदीप यादवला कर्णधाराने धीर दिला आणि संघातील खेळाडूंनीही कोणतीही चूक न करता कमालीचे झेट टिपले.
कुलदीप यादवने गुंडाळला पाकिस्तानचा डाव
कुलदीपने सईम अयुबला बाद केलं आणि संघाला दुसरी महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर कुलदीप त्याच्या स्पेलमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी आला. १७व्या षटकात कुलदीपच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कुलदीपने ३ विकेट्स घेत पाकिस्तानला लागोपाठ धक्के दिले. बुमराहने पहिल्या चेंडूत सलमान अली आघाला झेलबाद केलं. यानंतर चौथ्या षटकात आफ्रिदीला पायचीत केलं. यानंतर सहाव्या चेंडूवर त्याने फहीम अश्रफला झेलबाद करवत भारताची सामन्यातील स्थिती मजबूत केली. यासह कुलदीपने पहिल्या २ षटकांत २३ धावा दिल्या होत्या आणि नंतरच्या २ षटकांत त्याने ७ धावा देत ४ विकेट्स घेतले.