How To Reverse Diabetes: मधुमेह अर्थात डायबिटीज ही जगभरातील एक गंभीर समस्या बनली आहे. रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, रक्तातील अति साखरेच्या प्रमाणामुळे होणाऱ्या डायबिटीज ग्रस्त लोकांची संख्या १९९० मध्ये २० कोटी होती, ती २०२२ मध्ये ८३ कोटी झाली. डायबिटीज हा भारतातही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी एक आहे. देशभरात अंदाजे ७७ दशलक्ष लोक डायबिटीज ग्रस्त आहेत आणि २५ दशलक्ष प्री-डायबेटिक आहेत. देशात डायबिटीज असलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याने भारताला डायबिटीजची राजधानी असंही काही जण म्हणतात.
२०४५ पर्यंत भारतातील १३.५ दशलक्षहून अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त असतील. हे एवढं मोठं संकट समोर उभं असताना हा आजार कसा रोखता येईल म्हणजेच तो रिव्हर्स कसा करता येईल याबाबत अनेकदा तज्ज्ञ सांगतात. त्याबाबतच अधिक माहिती आणि उपाय जाणून घेऊ…
भारतातील डायबिटीजची परिस्थिती
देशात डायबिटीज रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. इथल्या अनेक कुटुंबांमध्ये किमान एक व्यक्ती डायबिटीजने ग्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंदाजे ७७ दशलक्ष लोकांना टाइप-२ डायबिटीज आहे आणि सुमारे २.५ कोटी लोकांना प्री-डायबिटीज आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की, २०४५ पर्यंत भारतात १३.५ कोटींहून अधिक लोकांना डायबिटीज असेल.
डायबिटीजची सुरूवातीची लक्षणे
डायबिटीज कसा बरा करायचा याचा शोध घेण्यापूर्वी डायबिटीज लवकर ओळखण्यास मदत करू शकणाऱ्या लक्षणांबाबत जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कुठल्याही आजाराचे निदान लवकर झाल्यास त्याचे उपचार आणि पुढील व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे सोपे होते. तसंच डायबिटीजचं सुद्धा आहे.टाइप-२ डायबिटीज साधारणपणे सुरूवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दर्शवत नाही, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होईपर्यंत तो शोधणं कठीण होतं. असं असलं तरी शरीरातील काही बदलांचे निरीक्षण करून तुम्ही डायबिटीजचे लवकर निदान करण्यास मदत करू शकता.
- स्किन टॅग्स
- मानेभेवती किंवा काखेतील त्वचेचा रंग काळा पडणे
- पोटाची चरबी
- हात सेल होणे आणि मानेच्या मागच्या बाजूला कुबड येणे
- वारंवार भूक लागणे
- सतत गोड खाण्याची इच्छा होणे
- पाय किंवा हातात मुंग्या येणे
- तुमची कंबर तुमच्या उंचीच्या अर्ध्यापेक्षा जास्त असणे
डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा?
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, सायलेंट किलर असणारा डायबिटीजबरा करण्यासाठी दोन सोप्या पद्धती आहेत. जर तुम्ही या पद्धती तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून घेतल्या तर ब्लड शुगर मॅनेज करणं सोपं होईल.
नाश्त्याच्या वेळेची काळजी
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, नाश्त्याचा वेळ हा प्रमुख कारण आहे. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी ४ ते ६च्या दरम्यान जास्त भूक लागते तेव्हा तुम्ही निरोगी खाण्याचा विचारही करणार नाही. अनेक जण या भूकेसाठी बिस्किटे, नमकीन किंवा इतर प्रकारचे जंक फूड खातात. म्हणून तुमचा नाश्ता अगदी हुशारीने निवडा. जंक फूड खाण्याऐवजी नाश्त्याच्या वेळेत निरोगी नाश्त्याचे पर्याय ठरवा. उदाहरणार्थ भाजलेले चणे, कुरमुरे, बाजरीचे कुरमुरे, मखाना किंवा खाखरा.
यावेळी तुम्ही मोड आलेले सॅलड, काळे चणे सॅलड, मसालेदार टोफू किंव पनीर, हमससह भाज्या, ग्वाकामोल, नट बटरसह फळे, बियांचे मिश्रण किंवा सूप असे पर्याय निवडू शकता. हे अतिरिक्त कॅलरजी आणि साखरेच्या वाढीशिवाय तुमची भूक भागवू शकतात, त्यामुळे डायबिटीजवर नियंत्रण करणे सोपे होते.
डायबिटीज बरा करण्यासाठी प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करा. ते रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त तुमचे जेवण एक वाटी सॅलड किंवा फ्राईड भाज्यांनी सुरू करा. दह्यामध्ये जवस पावडर घालायला विसरू नका. या सर्व पद्धती डायबिटीज बरा करण्यास अर्थात रिव्हर्स करण्यास मदत करतील.
