प्रत्येकालाचा वाटतं आपल्या जीवनात आयुष्यभर साथ देणारा सोबती असावा. आवडत्या व्यक्तीसोबत घट्ट मैत्री जुळली की हृदयात प्रेमाचा अंकुर फुटतो. पण हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी किती वेळा विचार करावा लागतो, याचा अंदाज लावता येणार नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी मनात सुरु असलेली धडपड निर्णय घेण्यासाठी होकार देते. पण मनातील भावना छान पद्धतीने कशा व्यक्त करायच्या असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आता तुम्ही जराही घाबरून जाऊ नका. कारण आम्ही तुम्हाला अशा पाच आयडीया सांगणार आहोत, ज्यामुळं तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग मिळू शकतो. काही जणांनी मोक्याच्या क्षणी प्रपोज करुन संधीचं सोनं केल्याचं व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. २०२२ हे वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर असतानात काही जबरदस्त व्हिडीओंच्या माध्यमातून मिळालेल्या आयडींयावर नजर मारूयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) द फिल्मी स्टाईल

बॉलिवूडच्या सिनेमांप्रमाणे रोमॅंटिक स्टाईलने प्रपोज करणं कुणाला आवडत नाही? एका तरुणाने चक्क पॅरीसच्या आयफेल टॉवरसमोर फिल्मी स्टाईलने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केला. त्याने एक जागा निवडली. त्या जागेवर फुलांनी आणि मेणबत्तीने सुंदर सजावट केली. एव्हढच नाही तर त्याने कुछ कुछ होता है सिनेमातील कोई मिल गया गाण्यावर डान्सही केलं. या गाण्यावर डान्स करुन त्याने प्रेयसीबाबत भावना व्यक्त केल्या.

२) द रेस ऑफ लव्ह

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आयोजीत केलेल्या बफेलो मॅरेथॉनमध्ये मॅडीसन नावाच्या धावपटूनं सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या तरुणीने कधी विचारही केला नसेल, असा सुखद धक्का तिला बसला. कारण तिला फिनीश लाईनवर एक मोठं सरप्राईज मिळालं. ते सरप्राईज एखादी वस्तू नसून तिचा प्रियकर जेम्स फिनीश लाईनसमोर उभा होता. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झालं. या दोघांची प्रेमकहाणीच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करु शकता.

नक्की वाचा – Video : ना चेंडू स्टंपला लागला ना बॅट! आपोआप बेल्स खाली पडल्या अन् फलंदाजाचा खेळ खल्लास, नेटकरी म्हणाले, “मैदानात भूत आला”

३) क्रिकेट आणि खूप काही…

क्रिकेटच्या मैदानात हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने प्रेयसीला प्रपोज करण्याची भन्नाट आयडीया एका तरुणाच्या डोक्यात आली. सिडनीच्या मैदानात भारत आणि नेदरलॅंड यांच्यात रंगतदार सामना सुरु असतानाच तरुणाने पार्टनरला प्रपोज केला. तो डोफ्यांवर बसला आणि प्रेयसीला प्रश्न विचारला अन् क्षणातच तिनं हो म्हटलं!

4) ड्रीमी अफेअर

एखाद्या प्लॅन केल्यानंतर स्वप्नांच्या दुनियेत जाऊन प्रपोज करण किती कठीण असतं? एका व्यक्तीने समोर आलेल्या अडचणींवर मात करून ड्रीमी प्रपोजलमध्ये कसा यशस्वी झाला, या प्रश्नाचं उत्तर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. हा सुंदर प्रपोजल व्हिडीओ तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाही.

५) हसत खेळत व्यक्त व्हा

एका तरुणाने समुद्राच्या मधोमध बोटीवर त्याच्या जोडीदाराला प्रपोज केला. प्रपोज करताना रिंग अचानाक पाण्यात पडल्यावर त्याने जे काही केलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसले. आपल्या जोडीदाराला प्रेमळ भावनेनं प्रपोज करण्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रेपोज करण्याची एक सुंदर आयडीया नक्कीच मिळेल, अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are thinking propose to your partner these videos will give you best ideas year ender 2022 trending news nss