नवरात्रीनंतर विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. विजयादशमीचा पवित्र दिवस हा जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचा आणि सौभाग्य तसंच समृद्धी प्राप्त करण्याचा दिवस आहे.
श्री रामाचे भक्त जगभरात आहेत. आज, २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी श्री रामांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना आणि नैवेद्य अर्पण करतील. ज्या घरात दशरथनंदनाची पूजा केली जाते, त्या घरात नेहमीच शांती आणि आनंद असतो असे मानले जाते. भक्तांना सौभाग्यदेखील प्राप्त होते. विजयादशमीला तुम्ही रघुनंदनाला त्याच्या आवडत्या तीन वस्तू अर्पण करू शकता.
रामाला खीर अर्पण करा
विजयादशमीला तुम्ही भगवान श्री रामांना तांदळाची खीर अर्पण करू शकता. खीर बनवताना त्यात केशर आवर्जून घाला. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. म्हणूनच त्यांना पिवळ्या रंगाचे नैवेद्य जास्त आवडतात.
पंजिरी
दसऱ्याच्या दिवशी तुम्ही भगवान श्री रामांना तुम्ही पंजिरी अर्पण करू शकता. यामध्ये तुम्ही कोथिंबीर पंजिरी, पिठाची पंजिरी, मावा पंजिरी, बडीशेप पंजिरी आणि सुंठ पंजिरी बनवू शकता.
बेसनाचे किंवा मोतीचूर लाडू
विजयादशमीला तुम्ही भगवान श्री रामांना बेसनाचे लाडू किंवा मोतीचूर लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तुम्ही फळेदेखील नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.