भरधाव कंटेनरने पीकअप व्हॅनला समोरून जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात मंगळवारी एकाच गावातील १४ जण जागीच ठार झाले. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर-धुळे महामार्गावर उस्मानाबाद जिल्हय़ातील चोराखळी (तालुका कळंब) गावाजवळ सायंकाळी ही दुर्घटना घडली. पीकअपमध्ये ३०-३५जण बसले होते. उपळाई (तालुका कळंब) येथील हे सर्व रहिवासी मंगळवारी कंदुरीचे जेवण करण्यासाठी गड देवधरी गावी गेले होते. तेथून परतताना औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरने पीकअपला धडक दिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2013 रोजी प्रकाशित
कंटेनर-व्हॅन धडकेत १४ ठार
भरधाव कंटेनरने पीकअप व्हॅनला समोरून जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात मंगळवारी एकाच गावातील १४ जण जागीच ठार झाले. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत
First published on: 20-02-2013 at 04:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 dead in van cantener clash