मराठी विश्वकोशाचा २० वा खंड ३१ डिसेंबपर्यंत उपलब्ध होत असून, विश्वकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला असल्याची माहिती, मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा विजया वाड यांनी दिली.
वाड पुढे म्हणाल्या, की विश्वकोशाचा २० वा खंड हा मराठीतील शेवटच्या ‘ज्ञ’ अक्षरापर्यंत आहे. यात सेऊल ते सेयबाद पर्यंत १२५० नोंदी आहेत. ३१ डिसेंबरला हा खंड सुरुवातीला नेटवर उपलब्ध होईल. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत याचे ग्रंथ सर्वत्र उपलब्ध  होतील. हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर मागील ५० वर्षांतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व यशवंतराव चव्हाणांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे स्मरण होईल. मागील सहा वर्षांत रखडलेले १७, १८, १९ खंड पूर्ण झालेले आहेत. कुमार विश्वकोष, जीवसृष्टी पर्यावरण, बोलका विश्वकोष, बोलका कुमार विश्वकोष दिला आहे. शास्त्रीजींच्या काळातच १ ते १६ खंड झाले होते. आता मराठी विश्वकोष इंटरनेटमुळे घराघरात पोहोचला आहे.  मराठी विश्वकोशही आता बोलका होत आहे. सरकारी परवानगी मिळताच हे काम पूर्ण होईल. बोलक्या विश्वकोशात जागतिक कीर्तीचे नामवंत शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. रविन थत्ते, स्नेहलता देशमुख, विजया वाड, डॉ. प्राजक्ता देशपांडे, अभिजित देशपांडे, संजय देशमुख व डॉ. हेमचंद्र प्रधान यांचा आवाज यासाठी उपलब्ध झाला आहे. मराठी विश्वकोशाचे जगभरात ११ लाख वाचक आहेत. भारतासह २२ देशात विश्वकोश वाचला जातो. जीवसृष्टी पर्यावरणाच्या दुसरा भाग येतो आहे. मराठी विश्वकोशाचा २० वा खंड झाल्यावर तो अद्ययावत करण्याच्या कामाकडे लक्ष दिले आहे. १९७१ साली विश्वकोशाचा पहिला खंड आला. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ४० वर्षांपूर्वी लोकांना माहित नसलेल्या अनेक व्यक्ती आता जगावर राज्य करत आहेत, रशिया, बर्मा या देशांचा भूगोल बदलला आहे.मराठी भाषा विभागाची मोठी सहकार्याची भूमिका यात आहे. शासन विश्वकोषाच्या वेबसाईटसाठी खर्च करत आहे. त्याचा निश्चित होईल. त्यामुळे आता विश्वकोषाच्या नाविन्याचं काम हाती घेतलं आहे. त्याचं महत्त्व अबाधित ठेवून मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही वाड यांनी सांगितले.
२० वा खंड हा मराठीतील शेवटच्या ‘ज्ञ’ अक्षरापर्यंत आहे. यात सेऊल ते सेयबाद पर्यंत १२५० नोंदी आहेत. ३१ डिसेंबरला हा खंड सुरुवातीला नेटवर उपलब्ध होईल. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत याचे ग्रंथ सर्वत्र उपलब्ध  होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20th block of marathi encyclopaedia will be ready this year end