लैंगिक छळप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना मंगळवारी लैंगिक छळप्रकरणाच्या दुसऱ्या गुन्ह्य़ात पोलिसांनी अटक केली.  माने यांच्याविरुद्ध शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध सहा बलात्काराचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ांपैकी एका गुन्ह्य़ात त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी नुकतीच सुनावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to laxman mane in second case