बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग व ८१४ गावे कर्नाटक घुसडण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. निपाणी येथे बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. १९५६ पासून मराठी भाषकांवर कर्नाटकात राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. तेव्हापासून या भागातील मराठी भाषक जनता महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. बेळगाव, बिदर, भालकी आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत निपाणीवासियांनी आज काळा दिवस पाळला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
सीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 01-11-2015 at 13:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black day in belgaum