जि. प.चा आरोग्य अधिकारी डॉ. रईस हाश्मी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. डॉ. हाश्मी याने आरोग्य विभागात शिपाई पदावर काम करणाऱ्या संजय राठोड यांची रजा मंजूर करण्यास ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. राठोड यांनी या बाबत लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून हाश्मीच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. उस्मानाबादेतील गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना असून, लाचलुचपत विभागाने लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोन लिपीक व आता जि. प.चा आरोग्य अधिकारी जाळ्यात अडकला आहे.