त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना मंगळवारी कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. डॉ. पाटील यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित पारंपरिक क्रीडा व संस्कृतीविषयक जागतिक परिषदेचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी आपले भाषण पूर्ण केले, पण तेव्हाही त्यांना त्रास जाणवत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr d y patil not feeling well