पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक व क्लीनर जागीच ठार झाले. या अपघातात ट्रक, राज्यपरिवहन मंडळाची बस व टँकर या वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आत्करगावाजवळ घडला.
ट्रकचा चालक हनुमंतअप्पा बसप्पा गाडद व क्लीनर संतोष कोळीशेट्टी (दोघे रा. बागलकोट-कर्नाटक राज्य) जागीच ठार झाले.  ट्रक चालक  ट्रकमधून साखरेची पोती घेऊन,  पुण्याहून- मुंबईकडे मार्गक्रमणा करीत होता. आत्करगांवचे हद्दीत ट्रकने, पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या राज्यपरिवहन मंडळाच्या  बसला ठोकर मारली. त्यामुळे बस-पुढील टँकरवर आदळली. अपघात करणारा ट्रक रोडच्या डाव्याबाजूला सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळला.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Express highway accident 2 died