बसमध्ये महिला प्रवाशाशी छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला केवळ १२०० रूपये दंड ठोठावण्यात आला. नगर-मनमाड या धावत्या बसमध्ये प्रवासी महिलेची छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर रात्री उशिरा प्रतिबंधात्मक कारवाई केली. याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या नगर-मनमाड या बसने एक महिला पतीसह प्रवास करत असताना येवला येथे गाडीमध्ये दाम्पत्याच्या मागील बाकावर बसलेल्या नरेश भट (रा. जळगाव) या व्यक्तीने छेड काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे ही महिला त्रस्त झाली. मनमाड रेल्वे थांब्यावर बस थांबली असता महिलेने आरडा ओरड केली. वाहकाला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ही बस मनमाड पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले. गुरूवारी त्यास मनमाड न्यायालयात उपस्थित केले असता १२०० रूपटे दंड ठोठावण्यात आला.