महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून याअंतर्गत प्रात्यक्षिक, निधी संकलन फेरी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता अग्निशमन मुख्यालयात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता श्रमिकनगरमधील श्रद्धा रुग्णालयात प्रात्यक्षिक, सायंकाळी चार वाजता सातपूरमध्ये निधी संकलन फेरी, १६ एप्रिल रोजी नवीन नाशिकमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये प्रात्यक्षिक, सायंकाळी चार वाजता सिडकोत फेरी, १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाशिकरोड विभागात प्रात्यक्षिक, सायंकाळी चार वाजता निधी संकलन फेरी, १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुख्यालय तसेच सायंकाळी चार वाजता संदर्भ सेवा रुग्णालयात फेरी, साडेचार वाजता बोरगड एअरफोर्स केंद्रात प्रात्यक्षिक, १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पंचवटीत प्रात्यक्षिक व चार वाजता निधी संकलन फेरी काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire brigade service week from sunday in nasik