देवळा : नाशिकमधील देवळ्याजवळील भावडबारी घाटात गुरूवारी सायंकाळी ट्रेलरने अ‍ॅपेरिक्षा व दोन दुचाकींना धडक दिल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांसह पाच ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमधील तीन जणांची ओळख पटली असून उर्वरित दोघांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती.भावडबारी घाटात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रेलर समोरील अ‍ॅपरिक्षा व दोन दुचाकींवर जाऊन धडकला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रेलर शंभर ते दीडशे फूट खोल दरीत जाऊन कोसळला. ट्रेलरच्या धडकेने अ‍ॅपेरिक्षाही दरीत ५० फूट फेकली गेली तर दुचाकींचा रस्त्यावरच चक्काचूर झाला. अपघातात अ‍ॅपेरिक्षातील चार व एक दुचाकीस्वार ठार झाला. त्यात शिल्पा रवींद्र वांगले, संगीता किशोर राणे (रा. कुंदेवाडी), गणेश बाळासाहेब देशमुख (लोहणेर) यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे.