कोकणात माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती अर्थात विनायक चतुर्थीपासून कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात होते.
 यानिमित्ताने विविध गणेश मंदिरात उत्सवाचे आयोजन केले जाते. अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात, तर महडच्या वरद विनायक गणेश मंदिरातही माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, सनईवादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानांच्या वतीने करण्यात आले आहे.