लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाडय़ातील सहा मतदारसंघांमध्ये शनिवारी शेवटच्या दिवशी अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड व बीड मतदारसंघांमध्ये ११२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक रिंगणात आता १४७ उमेदवार राहिले आहेत.
महायुतीत बंडखोरी कायम .
उस्मानाबाद – तीन जिल्हे, ११ तालुके व ६ विधानसभा मतदारसंघांच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य मिळविण्यासाठी महायुतीत बंडखोरी कायम राहिली. महायुतीचे प्रा. रवींद्र गायकवाड यांना लोकमंगलचे रोहन देशमुख यांनी आव्हान दिले. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, महायुतीचे प्रा. गायकवाड व बंडखोर उमेदवार रोहन देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शेवटच्या दिवशी १२जणांनी माघार घेतली. निवडणुकीच्या िरगणात आता २७ उमेदवार राहिले आहेत. १९५१पासून आजवर झालेल्या १५ निवडणुकांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक उमेदवार िरगणात आहेत.
या मतदारसंघातून ४१जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत मनसेचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे सचिन इंगोले यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. उर्वरित ३९ पकी १२ जणांनी माघार घेतली. यात शिवराज्यचे ज्ञानदेव श्रीमंत रणदिवे, अपक्ष भीमा इंगळे, अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राणाजगजितसिंह पाटील, शेषराव पाटील, प्रताप जाधव, भाऊसाहेब बेलुरे, रवी होनराव, शेतकरी संघटनेचे रामजीवन बोंदर, शेख वाजीद, अब्दुल करीम, शेषकला विनायक पाडुळे, तसेच जि. प. अर्थ-बांधकाम सभापती धनंजय सावंत यांचा समावेश आहे.
लातूरला भाजप बंडखोरांची माघार
लातूर – लातूर मतदारसंघात शेवटच्या दिवशी ९ जणांनी अर्ज मागे घेतले. भाजपतील सर्वच बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता येथे सरळ लढत रंगणार आहे. भाजप आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार टी. पी. कांबळे, सुरेंद्र घोडजकर या तिघांनीही आपले अर्ज मागे घेतले. महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे बसवंत उबाळे यांनीही अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे, भाजपचे सुनील गायकवाड, बसपचे दीपक कांबळे, आपचे दीपरत्न निलंगेकर या प्रमुख उमेदवारांसह एकूण १८ जण निवडणुकीच्या िरगणात आहेत. उमेदवारांची संख्या सोळापेक्षा अधिक असल्यामुळे आता प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्रे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला मतदान यंत्रांची संख्या दुपटीने वाढवून घ्यावी लागणार आहे.
परभणीला १७ उमेदवार रिंगणात
परभणी – शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे परभणी मतदारसंघात आता १७ उमेदवार िरगणात राहिले आहेत. १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने मतदानासाठी दोन यंत्रे द्यावी लागणार आहेत. एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पकी दोघांचे अर्ज अवैध ठरले. काल एका अपक्षाने उमेदवारी मागे घेतली. शनिवारी शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे विजय भांबळे, शिवसेनेचे संजय जाधव, आपच्या सलमा कुलकर्णी, बसपचे गुलमीरखान, भाकपचे राजन क्षीरसागर, भारिप महासंघाचे महमंद इलियास, सपाचे अजय करंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे बबन मुळे, लालसेनेचे गणपत भिसे, अपक्ष शेख सलीम, रामराव राठोड, सय्यद अब्दुल रहिम, उद्धव पवार, अशोक दुधगावकर, प्रदीप काजळे, प्रमोद मारोती पंडितकर, निसार सुभान खान हे १७ उमेदवार िरगणात आहेत.
िहगोलीत २४ उमेदवारांची माघार
िहगोली – िहगोली मतदारसंघात शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक मदानात २३ उमेदवार राहिले आहेत. काँग्रेस आघाडीचे राजीव सातव, शिवसेनेचे सुभाष वानखेडे, आपचे विठ्ठलराव कदम, सपाचे शेख नईम, बसपचे चुन्नीलाल जाधव यांचा यात समावेश आहे. एकूण ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज अवैद्य ठरले.
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे पांडुरंग देसाई, कम्युनिस्ट पक्षाचे धनुसिंग नाईक, अवामी विकास पार्टीचे संतोष सगने, भारिप महासंघाचे रामराव राठोड, बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड यांच्यासह अपक्ष सुरज कोंडरवाड, अनंत भरेसे, प्रकाश घुन्नर, बालासाहेब देशमुख, देवजी असोले, राजू शंकर सातव, उत्तम राठोड, सुभाष काशिबा वानखेडे, आत्माराम राखोजी सातव, दिगंबर नाईकवाडे, उत्तम धाबे व अशोक सुर्यवंशी यांचा रिंगणातील उमेदवारांमध्ये समावेश आहे.
नांदेडात ४२ जणांची माघार
नांदेड – नांदेड मतदारसंघात शेवटच्या दिवशी ४२ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात २३ उमेदवार राहिले आहेत. माजी आमदार डॉ. डी. आर. देशमुख, गंगाधर पटने यांचा अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण, महायुतीचे डी. बी. पाटील, आपचे नरेंद्रसिंग ग्रंथी, मुस्लिम लीगचे अल्ताफ बेग, सपाचे बालाजी शिंदे, भारिप महासंघाचे रामचंद्र सावंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू बहुजन मुक्ती पार्टीचे राजरत्न आंबेडकर आदी उमेदवार रिंगणात आहेत.
बीडमध्ये १६ जणांची माघार
बीड – बीड लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी १६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे रिंगणात आता ३९ उमेदवार राहिले आहेत. प्रमुख लढत महायुतीचे गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात होणार असली, तरी आपचे नंदू माधव यांच्यासह विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार किती मते मिळवितात, त्यावरच लढतीची चुरस ठरणार आहे.