मागील आठ दिवसांपासून सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्याचा संकल्प मंगळवारी रात्री झालेल्या बठकीत मोडीत निघाला. बुधवारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १९६ जणांनी माघार घेतली. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी निवडणूक िरगणात ३८ जण राहिले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी-भाजप  असे दोन पॅनेल आमनेसामने लढणार आहेत. जि. प. तील पक्षीय बलाबल पॅटर्नप्रमाणे शिवसेना व काँग्रेस या निवडणुकीत एकत्र आले असून, भाजपाने राष्ट्रवादीशी घरोबा करीत केवळ तीन जागांवर समाधान मानले.
एकेकाळी शेतकऱ्यांची आíथक नाडी ठरलेल्या जिल्हा बँकेला ऊर्जतिावस्था मिळण्यासाठी बिनविरोध निवडणुकीची संकल्पना मागील आठ दिवसांत रूढ झाली होती. सोमवारी तुळजापुरात आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उस्मानाबाद शहरात सर्वपक्षीयांची बिनविरोध निवडीसाठी चर्चा सुरू होती. बँकेच्या आर्थिक संकटाला जबाबदार असलेल्या विविध संस्था, कारखान्यांनी थकीत कर्ज न भरल्याने बँक डबघाईला आली. जालना, धुळे, बुलढाणा, नागपूर बँकांप्रमाणे उस्मानाबाद बँकेला आर्थिक मदत होऊन ऊर्जतिावस्था प्राप्त करून देण्यासाठी निवडणुकीनंतर सर्व पक्षीयांनी सरकारकडे प्रयत्न करण्याची चर्चा बठकांमध्ये झाली. परंतु मंगळवारी रात्री जागा वाटपावरून हट्ट करणाऱ्यांनी बिनविरोधाची संकल्पना मोडीत काढत बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी शड्ड थोपटले.
शिवसेना नेते प्रा. तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना बँक व शेतकऱ्यांच्या हिताचे काही देणे-घेणे नाही. बँकेवर सत्ता मिळवून आपलेच अधिक संचालक आहेत, असे म्हणत मिरवायचे आहे, असा आरोप प्रा. सावंत यांनी केला.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी, बँकेची आíथक स्थिती चांगली नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीच्या स्वार्थीपणामुळे निवडणूक लादली गेली. राष्ट्रवादीला बँकेच्या स्थितीबाबत काहीही घेणे-देणे नाही, असा आरोप केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले की, भाजपचे दोन सदस्य राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. बिनविरोधसाठी आमचाच प्रयत्न होता, परंतु सर्व पक्षीयांच्या बठकीत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे आपले काही देणे-घेणे नाही, असे सांगितल्यामुळे ही निवडणूक लादली गेली. नारायण समुद्रे, बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी आमदार ओम राजेिनबाळकर, सुनील चव्हाण, सुधाकर गुंड आदी उपस्थित होते.
दोन पॅनेलमध्ये लढत
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षनेत्यांनी अचानक निर्णय घेऊन आश्चर्यकारक युती केली. जि. प. तील पक्षीय बलाबलाच्या पॅटर्नप्रमाणे काँग्रेसने सेनेशी, तर भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काँग्रेस-सेना व भाजप-राष्ट्रवादी, अशा दोन पॅनेलमध्ये काटय़ाची लढत होणार आहे.
काँग्रेस-सेना युतीचे उमेदवार (काँग्रेस ९, शिवसेना ६ जागा)
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ – उस्मानाबाद – संजय गौरीशंकर देशमुख (शिवसेना), तुळजापूर – सुनील मधुकर चव्हाण (काँग्रेस), कळंब – गोकुळ नानासाहेब शेळके (काँग्रेस), उमरगा – बापूराव माधवराव पाटील (काँगेस), परंडा – ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), भूम – किरण पाटील (शिवसेना), लोहारा – नागप्पा शरणप्पा पाटील (काँग्रेस), वाशी – बिभीषण खामकर (काँग्रेस), महिला राखीव – प्रतिभा काकासाहेब पाटील (काँग्रेस), पुष्पा सुभाष मोरे (शिवसेना),  इतर संस्था मतदारसंघ – नारायण समुदे (काँग्रेस), नागरी बँक/पतसंस्था मतदारसंघ – सुधीर केशवराव पाटील (शिवसेना), इतर मागास प्रवर्ग – हरिश्चंद्र गुणवंत कुंभार (शिवसेना), एससी/एसटी प्रवर्ग – राजाभाऊ कडाप्पा शेरखाने (काँग्रेस), अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग – बाबुराव पाटील (काँग्रेस).