सवार्ंना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी येत्या ३ डिसेंबरला समाजवादी अध्यापक परिषद येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहे. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी नेते तथा स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारेख उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या भांडवलशाही शैक्षणिक धोरणामुळे स्त्रिया, दलित, आदिवासी आणि भटके विमुक्त जमातीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. श्रीमंतांसाठी पंचतारांकित शिक्षणाचे तर गरिबांसाठी अपुऱ्या सोयींचे शिक्षण देणारे धोरण राबविले जात आहे. त्यामुळे सर्वांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी समाजवादी अध्यापक परिषदेने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनाअनुदान धोरण रद्द करून विद्यार्थ्यांच्या बालवाडी ते उच्चशिक्षणापयर्ंतची जबाबदारी सरकारने घ्यावी ,यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ ते ८ टक्के खर्च शिक्षणावर करावा, तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या शिक्षणाचा शिक्षण हक्क कायद्यात समावेश व्हावा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीसाठी प्रशासकीय स्तरावर पाऊल उचलावे, गुणवत्ता वाढीच्या नावाखाली शाळांचे खाजगीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी, जिल्ह्य़ातील विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करावे, खाजगी शाळांमध्ये बहुजनांना प्रवेशात अग्रक्रम द्यावा, यांसारख्या मागण्यांसाठी हा सत्याग्रह करण्यात येणार आहे. या सत्याग्रहात जिल्ह्य़ातील शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajvadi profecers parishad andolan is on 3rd december