संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पायी दिंडीचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. जादूटोणाविरोधी विधेयकाची कायदा पुस्तिका भेट देऊन दिंडीतील वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यभरातून जादूटोणाविरोधी विधेयकास प्रखर विरोध होत असताना तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या िदडीने जाहीरपणे या विधेयकास पािठबा दिला होता.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथून गोरोबा काकांची पालखी दरवर्षी काíतकीसाठी पंढरीला जाते. या वारीला सातशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा लाभलेली आहे. १२ व्या शतकात संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या भेटीसाठी ज्ञानेश्वर माऊली संतमेळ्यासह तेर येथे आले होते. अध्यात्माची, ज्ञानाची व समाजप्रबोधनाची प्राचीन परंपरा असलेल्या तेरच्या पालखी सोहळ्याने गतवर्षी जादूटोणा विरोधी कायद्याला जाहीर पािठबा दिला होता. देवाच्या नावाने श्रद्धेचा बाजार करणाऱ्या देवर्षीची जागा कारागृहातच असायला हवी, अशी परखड भूमिका िदडी सोहळ्यातील विणेचे मुख्य मानकरी नामदेव अंबऋषी थोडसरे यांनी व्यक्त केली. िदडीचे व्यवस्थापक श्रीहरी बंडू थोडसरे यांनी संत-महंतांनी हेच काम केले. त्यामुळे पुढील काळात संतांचे विचार पुढे नेण्याचे काम हा कायदा करील, असा विश्वास व्यक्त केला होता. िदडी सोहळ्याचे चोपदार केशव मुळे व उत्तम दगडू घोडके यांनीही खरा वारकरी या कायद्याला कधीच विरोध करणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते.
वारकरी संप्रदायातील एक गट या कायद्याला विरोध करीत आहे. मात्र तेरच्या वारकऱ्यांनी या कायद्याला जाहीर पाठिंबा दिल्याने अंनिसने पालखीचे स्वागत केले. शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ िदडी सोहळा आल्यानंतर अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी संत गोरोबा काकांच्या पालखीचे दर्शन घेऊन विज्ञानाची खरी चळवळ आध्यात्मिक मार्गाने जिवंत ठेवणाऱ्या काकांच्या िदडीतील रघुनंदन महाराज पुजारी यांचा अंनिसचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे यांनी हार, कायद्याची पुस्तिका व विशेषांक देऊन सत्कार केला. त्याचबरोबर िदडी सोहळ्यातील वारकऱ्यांना अंनिसचा विशेषांक आणि जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तिका भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
‘अंनिस’कडून वारकऱ्यांचे स्वागत; जादूटोणा विधेयक पुस्तिकेची भेट
संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पायी िदडीचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. जादूटोणाविरोधी विधेयकाची कायदा पुस्तिका भेट देऊन िदडीतील वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
First published on: 28-10-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to warkari by ans