अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच होती. आता फरदीनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चक्क आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत फरदीनने आपल्या तान्ह्या बाळाला हातावर घेतले आहे. आपल्या बाळाकडे एकटक पाहण्यात जणू तो मग्न झाला आहे. तर ते बाळही शांत झोपलं आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर करताना त्याने चाहत्यांचे आभार मानले. ‘तुम्ही दिलेल्या शुभेच्छाचा दिआनी नताशा आणि मी आभारी आहोत.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरदीन आणि नताशाचे हे दुसरे अपत्य असून त्यांनी मुलाचे नाव अझरिउस असं ठेवलंय. फरदीनला तीन वर्षांची मुलगी अजून तिचे नाव डियानी इसाबेल खान असे आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नताशा आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहतेय. बाळाला लंडनमध्येच जन्म देण्याचा निर्णय या दोघांनी आधीच घेतला होता. फरदीनने अभिनेत्री मुमताज यांची कन्या नताशा हिच्यासोबत २००५ मध्ये लग्न केले. १२ वर्षांपूर्वी मुंबईत शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आवर्जुन हजेरी लावली होती. फरदीनने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमात काम केलेय. २०१० मध्ये आलेल्या ‘दुल्हा मिल गया’ या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. पण त्यानंतर तो गायब झाला. अचानक काही महिन्यांपूर्वी त्याचे वजन वाढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fardeen khan shares adorable picture of newborn son thanks fans for wishes see photo