माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्घू हा आता एका ‘कॉमेडी शो’मध्ये दिसणार आहे. हा शो संपूर्ण कुटुबांने एकत्रित पाहण्यासारखा असल्याने यामध्ये कोणतेही दुहेरी अर्थाचे विनोद असणार नाहीत. माझ्यासाठी विनोदाचा अर्थ लोकांना हसवणे असा आहे, असे सिद्धूने सांगितले.
बिग बॉस या रिअॅलिटी शोनंतर सिद्धू आता ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल ‘ यामध्ये सहभागी होणार आहे. हा शो २२ जूनपासून कलर्स वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. सिद्धू कपिल शर्मा सोबत मजेदार विनोद करताना दिसेल. आपण दुहेरी अर्थाच्या शोच्या विरुद्ध असून हा एक कौटुंबिक कॉमेडी शो असणार आहे. यात कोणताही अतिरेक होईल, काही मानहानीकारक किंवा जे कुटुंबासाठी अर्थपूर्ण नसतील असे कोणतेही विनोद आम्ही करणार नाही. विनोदामुळे लोकांचा तणाव थोडा कमी होतो. तेच काम आम्ही या शोमधून करणार आहोत, असे सिद्धू म्हणाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-06-2013 at 09:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot sidhu against double meaning jokes