हेरगिरीचा बादशाह ‘जेम्स बॉंन्ड’ ची भूमिका साकारलेला हॉलिवूड अभिनेता पीअर्स ब्रॉसननची मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. याच आजाराने बावीस वर्षापूर्वी तिची आई कॅसेन्ड्रा हॅरीस हिचादेखिल मृत्यू झाला होता.
वयाच्या ४१ व्या वर्षी लंडन येथे २८ जून रोजी शार्लटची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त ‘अेस शोबीझ’ने दिले आहे. ‘२८ जून रोजी माझी प्रिय मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने दुर्देवी अंत झाला, असे ब्रॉसननने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
तिच्या मृत्यूच्या वेळी तिचा पती अॅलेक्स, मुलं इसाबेला आणि लुकास व भाऊ ख्रिस्तोफर आणि सीन जवळ होते.
शार्लटने मोठ्या हिमतीने आणि शांत व समजूतदार वृत्तीने आजाराशी शेवटपर्यंत लढा दिला. अतिशय जड अंत:करणाने आम्ही आमच्या सुंदर मुलीला निरोप देत आहोत. या आजारावर लवकरावर निदान उपलब्ध व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आम्ही आभार मानतो, असं ब्रॉसनन म्हणाले.
शार्लट आणि ख्रिस्तोफर हि हॅरीस यांच्या पहिल्या लग्नानंतर झालेली अपत्य आहेत. १९८० मध्ये हॅरीस आणि ब्रॉसनन यांच्या विवाहानंतर ते एकत्र राहत होते. पुढे आपल्या जैविक पित्याचा मृत्यू झाल्यानंतर ब्रॉसनन यांनी त्यांना दतत्क घेतले. हॅरीस आणि ब्रॉसनन यांना सीन नावाचा मुलगा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
‘जेम्स बॉंन्ड’च्या मुलीचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू
हेरगिरीचा बादशाह 'जेम्स बॉंन्ड' ची भूमिका साकारलेला हॉलिवूड अभिनेता पीअर्स ब्रॉसननची मुलगी शार्लट हिचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. याच आजाराने बावीस वर्षापूर्वी तिची आई कॅसेन्ड्रा हॅरीस हिचादेखिल मृत्यू झाला होता.

First published on: 02-07-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pierce brosnan loses daughter charlotte to ovarian cancer