कतरिनासोबतच्या छायाचित्रांमुळे चर्चेत असलेला बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर त्याच्या बंगल्यामध्ये बार बांधत असून तो यासाठी ८० लाख रुपये खर्च करत आहे. Mid-Day.comने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, कृष्ण राज या त्याच्या बंगल्यावर ८० लाख रुपये खर्च करून तो एक महागडा बार बांधत असून, त्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय इंटेरियर डेकोरेटर्सची निवड केली आहे. घरातील या स्वतंत्र बारमुळे कुटुंबियांना कोणताही त्रास न होता तो पार्टीचे आयोजन करुन मित्रमंडळीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकणार आहे. त्याचबरोबर, बंगल्यामध्ये स्वतःसाठीचे स्वतंत्र असे प्रवेशद्वारही तो तयार करुन घेत आहे.
सध्या, अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटसाठी रणबीर श्रीलंकेत चित्रिकरण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor spends rs 8 million for high end bar