आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. ( सौजन्य : सर्व फोटो मानसी नाईक/प्रदीप खरेरा इन्स्टाग्राम पेज) तिची 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. मानसीचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. मानसी नेमकं कोणाला डेट करते?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, आता मानसीने सगळ्या प्रश्नांची उत्तर फोटो शेअर करत दिली आहे. नुकताच मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा साखरपुडा झाला आहे. प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर असून एक मॉडलदेखील आहे. गेल्या काही वर्षांपासून मानसी आणि प्रदीप एकमेकांना डेट करत होते अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. मंगळवारी मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा साखरपुडा झाला. फक्त ६ लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात मानसीने लाइट ऑरेंज आणि ग्रीन रंगाची साडी नेसली होती. तर प्रदीपने प्रिंटे़ड शर्ट आणि पजामा कुर्ता परिधान केला होता. मानसीने या सोहळ्याला दोघंही फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. मानसी व प्रदीप जानेवारीमध्ये लग्न करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. -
गणेशोत्सवात मानसी व प्रदीपने केलेलं खास फोटोशूट
-
प्रदीप खरेरा
मानसी नाईक एंगेज; पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा
Web Title: Actress manasi naik gets engaged to pardeep kharera ssj