• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. agga bai sasubai tv serial shubhra babdya fame ashutosh patki tejashri pradhan reunite new project see photos sdn

‘अग्गंबाई सासूबाई’नंतर बबड्या आणि शुभ्रा पुन्हा एकत्र; कारण आहे खास

August 17, 2021 10:49 IST
Follow Us
  • Ashutosh Patki Tejashri Pradhan New Project Photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई'.

  • 2/15

    अल्पावधीतच 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

  • 3/15

    या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते.

  • 4/15

    बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली होती तर शुभ्रा हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारले होते.

  • 5/15

    या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आशुतोष आणि तेजश्री हे सोशल मीडियावर चर्चेत असतात.

  • 6/15

    आता कामानिम्मत तेजश्री आणि आशुतोष पुन्हा एकत्र आले आहेत.

  • 7/15

    आशुतोषने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शॉर्ट फिल्म बनवली आहे. त्याची ही फिल्म चाहत्यांना आवडली आहे.

  • 8/15

    'हा कलाकारांचा प्रामाणिकपणा आहे… सर्व क्रू मेंबर्सची निष्ठा आणि निर्मात्यांचा विश्वास… यामूळेच हा प्रोजेक्ट शक्य झाला… आणि हो, हे सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले…माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी माझ्यावर विश्वास ठेवला! आणि आम्ही सर्वांनी मिळून देशासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून हा छोटासा प्रयत्न केला. तुम्ही हे पाहिलंय का? नाही? तर बायो मध्ये लिंक शेअर केलेली आहे. तुमच्या अमूल्य अभिप्रायाची वाट पाहतो आहे.' अशी पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.

  • 9/15

    'संरक्षक देवदूत' असं या शॉर्ट फिल्मचे नाव आहे.

  • 10/15

    या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन आशुतोष पत्कीने केले आहे आणि लेखन तेजश्री प्रधानने केले आहे.

  • 11/15

    अभिनयाची आवड असली तरी आशुतोषच्या करिअरची सुरवात मात्र सहाय्यक दिग्दर्शनाने झाली होती.

  • 12/15

    आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे.

  • 13/15

    आशुतोष आणि तेजश्री सतत एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या.

  • 14/15

    तेजश्रीने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'आशुतोष हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला. मालिका सुरु असताना आमच्यात काही तरी सुरु आहे अशा चर्चा व्हायच्या. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण आमच्यात मैत्रीपलिकडे काहीच नाही' असे तेजश्री म्हणाली.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम)

Web Title: Agga bai sasubai tv serial shubhra babdya fame ashutosh patki tejashri pradhan reunite new project see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.