-
भारतीय रेल्वेने ऐतिहासिक कामगिरी केलीये. कारण भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘हॉस्पिटल ट्रेन’ बनवली आहे. जगातील कोणत्याही देशात अद्याप अशाप्रकारच्या स्पेशल हॉस्पिटल ट्रेनची सुरूवात झालेली नाही.
-
या ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असतील, त्यामुळे 'लाइफलाइन एक्स्प्रेस' असं या ट्रेनचं नाव ठेवण्यात आलं आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
-
भारतीय रेल्वेने ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध आहेत. शिवाय अत्याधुनिक उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम यात तैनात आहे.
-
ही हॉस्पिटल ट्रेन 7 डब्ब्यांची असून या ट्रेनमध्ये 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, 5 ऑपरेटिंग टेबल आहेत. यासह ट्रेनमध्ये मेडिकल स्टाफ रुमही आहे.
-
सध्या ही ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर उभी असून विशेष म्हणजे सर्व रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. सर्वात आधी भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची सुरूवात केलीये, त्यानंतर आता इतर देशही अशी ट्रेन सुरू करण्याचा विचारात आहेत. ही ट्रेन म्हणजे एक चालतं-फिरतं रुग्णालय आहे. ( सर्व फोटो सौजन्य – भारतीय रेल्वे मंत्रालय ट्विटर अकाउंट )
‘लाइफलाइन एक्स्प्रेस’: भारताने बनवली जगातली पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’, उपचार मोफत
भारतीय रेल्वेने रचला इतिहास…प्रत्येक भारतीयाचा अभिमान!
Web Title: Indian railways created history with worlds first hospital train lifeline express currently stationed in assam sas