• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. a young member of potraj community performs for his daily bread off mg road in camp amid covid 19 outbreak in pune psd

कशासाठी…पोटासाठी

पोटाची खळगी भरण्यासाठी पोतराज पुन्हा रस्त्यावर

August 12, 2020 18:51 IST
Follow Us
  • करोनाच्या प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारने हळुहळु अनलॉकची प्रक्रीया सुरु केली आहे. या लॉकडाउनचा फटका राज्यातील अनेक छोट्या घटकांना बसला....पोतराज किंवा कडक लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या समुदायातील लोकांनाही या लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला. (सर्व छायाचित्र - अरुल होरायझन)
    1/

    करोनाच्या प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारने हळुहळु अनलॉकची प्रक्रीया सुरु केली आहे. या लॉकडाउनचा फटका राज्यातील अनेक छोट्या घटकांना बसला….पोतराज किंवा कडक लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या समुदायातील लोकांनाही या लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)

  • 2/

    पोतराज हे देवीचे उपासक मानले जातात. हातात चाबूक घेऊन आपल्या पाठीवर फटकारे ओढत ही मंडळी घरोघरी जाऊन भिक्षा मागत असतात.

  • 3/

    लॉकडाउन काळात लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई होती, त्यामुळे या लोकांचे बरेच हाल झाले. पुणे शहरात अनलॉक सुरु झाल्यानंतर हे पोतराज पुन्हा एकदा बाहेर पडले आहेत.

  • 4/

    पोतराजांचं सर्व आयुष्य हे भिक्षा मागून त्यावर चालतं…त्यामुळे पोटाची खळगी भरायची असेल तर घराबाहेर पडावं लागणारच.

  • 5/

    स्वतःच्या अंगावर चाबुकाचे फटके ओढत भिक्षा म्हणून पैसे किंवा अन्न मागायचं…

  • 6/

    पोतराज हे पुरुष असले तरीही महिलेचा वेश करुन ते भिक्षेसाठी रस्त्यावर उतरतात

  • 7/

    घराबाहेर पडताना मास्क लावून ही मंडळी जमेल तेवढी काळजी घेत आहेत.

  • 8/

    घराबाहेर पडलं तर करोनाची भीती आणि घरात राहिलं तर उपाशी राहून जीव जायची वेळ…त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अखेरीस जिवावर धाडस करत बाहेर येऊन पोतराजांना पुन्हा एकदा चाबकाचा फटका ओढावाच लागत आहे.

Web Title: A young member of potraj community performs for his daily bread off mg road in camp amid covid 19 outbreak in pune psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.