चॅट जीपीटी आणि बार्डसारख्या एआय चॅटबॉट्सशी स्पर्धा करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एलॉन मस्कने स्वतःचा AI चॅटबॉट जगासमोर आणला. त्यांनी स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI तयार केली आहे आणि AI चॅटबॉटला ग्रोक (GrokAI) असे नाव दिले. एक्स (ट्विटर) X Premium व प्रीमियम प्लस (Premium+) वापरकर्त्यांद्वारे या चॅटबॉटमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. तर युजर्ससाठी एक खास बातमी समोर येत आहे. इन्स्टाग्राम ॲप ‘स्टोरी’ (Story) या फीचरसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यातच आता नवीन ‘रिव्हील’ फीचरदेखील जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता ट्विटर (एक्स)ने त्यांच्या नवीन फीचर ‘स्टोरीज’ला AI जोडण्याचे ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इन्स्टाग्राम स्टोरी फीचर आणि एक्स (ट्विटर)चे स्टोरी फीचर खूप वेगळे असणार आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटवर युजर्स त्यांच्या पसंतीनुसार क्रमवार स्टोरीवर फोटो, व्हिडीओ, मजकूर शेअर करतात. पण, एलॉन मस्कचे स्टोरी फीचर ट्विटर (एक्स) एक्सप्लोर विभागातील वैयक्तिक ट्रेंडिंग गोष्टींचा सारांश देण्यासाठी ग्रोक एआय चॅटबॉट जोडणार आहे. म्हणजेच एआयची मदत घेऊन हा सारांश स्टोरीमध्ये रूपांतरित होणार आहे.

हेही वाचा…स्टोरी, रील शेअर करताना ‘या’ नवीन स्टिकर्सची होईल मदत; कसा करायचा उपयोग? फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

एक्स (ट्विटर) इंजिनियरिंग टीमने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटनुसार ‘स्टोरीज’ हे फीचर युजर्सच्या ट्विटवर आधारित सारांश तयार करील. पारंपरिक बातम्यांच्या लेखांवर आधारित नाही . त्याउलट एक्स (ट्विटर)वरील ‘स्टोरीज’ युजर्सच्या आवडीनुसार बातम्यांच्या स्वरूपात पेजवर प्रदर्शित केल्या जातील, अशी घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर वरील स्टोरी २४ तासांनंतर दिसत नाहीत. पण, एक्स (ट्विटर)चे स्टोरीज फीचर या प्रकरणात वेगळे असू शकते.

एक्स (ट्विटर)च्या ग्रोक एआय चॅटबॉट ग्रोकमध्ये प्रवेश करण्यासाठी युजर्सना प्रीमियम सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागेल. प्रीमियम आणि टॉप-टियर प्रीमियम+ प्लॅन असलेल्या युजर्सना ॲपच्या खालच्या मध्यभागी बटणावर टॅप करून ग्रोकमध्ये प्रवेश मिळविण्याची परवानगी दिली जाईल. तर अशा प्रकारे युजर्स या स्टोरी फीचरचा, तसेच एक्स (ट्विटर)चा आनंद घेऊ शकणार आहेत.