Amazon Sale 2023: Amazon ने २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सेलची घोषणा केली आहे. ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे’ असे या सेलचे नाव आहे. हा सेल १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२३ असा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान खरेदीदारांना अनेक ब्रँड्सच्या प्रॉडक्ट्सवर ऑफर्स मिळणार आहेत. यामध्ये ओप्पो(Oppo) , शाओमी(Xiaomi), वनप्लस(OnePlus), सॅमसंग(Samsung), विवो(vivo) आणि अ‍ॅप्पल(Apple) यांच्या प्रॉडक्ट्सवर लाभ मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अ‍ॅक्सेसरीज, गॅझेट्स, कपडे यासह इतर अनेक गोष्टींवर डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स असणार आहेत. स्मार्टफोन्स , अॅक्सेसरीज, स्मार्टवॉच, लॅपटॉप्स आणि बऱ्याच वस्तूंवर ४० टक्के सूट मिळणार आहे.अ‍ॅमेझॉन इंडियाने एसबीआय कार्ड वापरकर्त्यांसाठी क्रेडिट कार्ड व ईएमआय या व्यवहारांवर १० टक्के सूट जाहीर केली आहे.

हेही वाचा : Airtel की Jio? कोणाचे 5 जी प्लॅन आहेत फायदेशीर; जाणून घ्या

क्रॉम्प्टन सोलारियम क्यूब आयओटी गीझर (Crompton Solarium Qube IOT Geyser)

क्रॉम्प्टन सोलारियम क्यूब IOT 15L स्मार्ट स्टोरेज वॉटर हीटर (गिझर) अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये १७,००० ऐवजी १२,४९९ रुपयांना मिळणार आहे. खरेदीदार हे येस बॅंकचे क्रेडिट कार्ड वापरले असता १५०० रुपयांचा ईएमआय असणार आहे. तसेच ७.५ टक्के इतकी सूट त्यात मिळणार आहे. हे वॉटर हिटर (गिझर) वायफायशी कनेक्ट आहे. जे क्रॉम्प्टन मोबाईल अ‍ॅपद्वारे कुठूनही नियंत्रित केले जाऊ शकते. यात स्मार्ट शेड्युलर, प्री -सेट टायमर आणि कस्टमाइज्ड बाथ मोड यांसारखे फीचर्स आहेत.

सन विल बॅटरी हीटेड बीनी हॅट ही एक इलेक्ट्रिक रिचार्जेबल उबदार हिवाळ्यातील तापलेली फ्लीस कॅप आहे. जी १५,१९८ च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. ग्राहक या डीलवर फेडरल बँक कार्ड्सवर ३०० रुपयांवर १० टक्के सूट मिळेल. ही बॅटरी कॅप UL/CE प्रमाणित ७.४V २२००mah रिचार्जेबल लिथियम बॅटरी येत. ही कॅप सुमारे चार तासांत पूर्णपणे चार्ज होईल आणि ८ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Samsung पासून Redmi पर्यंत ‘हे’ स्मार्टफोन्स मिळतायत १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत; जाणून घ्या फीचर्स

JAWL हीटिंग स्कार्फ

JAWL हीटिंग स्कार्फ हा इलेक्ट्रिक हिटेड नेक वॉर्मर आहे जो अ‍ॅमेझॉनवर १५७१ रुपयांना मिळणार आहे. येस बँक क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांचा ईएमआय व या कार्ड व्यवहारावर ७.५टक्के सूट मिळणार आहे. हे स्कार्फ मान, खांदा आणि गुडघेदुखी दूर करते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon great republic day 2023 sale will offer huge discounts on many items tmb 01