Amazon Great Summer Sale: अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा ग्राहकांसाठी २०२४ आकर्षक ग्रेट समर सेल घेऊन आला आहे. २ मे रोजी दुपारी २ वाजता हा सेल भारतात सुरू होईल. ॲमेझॉन ग्रेट समर सेलसाठी एक मायक्रोसाइट ई-कॉमर्स कंपनीच्या इंडिया वेबसाइटवर लाइव्ह दिसेल आणि मागील सेलप्रमाणे प्राइम सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधी सुरू होईल. स्मार्टफोन, ॲक्सेसरीज, ब्युटी प्रोडक्ट्स आणि लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि स्मार्ट टीव्ही आदी उत्पादनांच्या विक्रीच्या किमतीत कपात केली आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनने त्यांच्या कार्ड वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त सवलत देण्यासाठी आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि वन कार्डबरोबर पार्टनरशिप केली आहे.

ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. वनप्लस (OnePlus), रेडमी (Redmi) आणि रिअलमी (Realme) आदी ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या विक्रीदरम्यान किमती कमी होतील. ॲमेझॉनने सेल संबंधित सर्व यादी दर्शवलेली नाही. पण, वनप्लस ११ आर ५ जी (OnePlus 11R 5G), रेडमी १३ सी (Redmi 13C), आयक्यूओओ झेड६ लाईट (iQoo Z6 Lite), रिअलमी नाझरो ७० प्रो ५जी (Realme Narzo 70 Pro 5G) आणि रेडमी १२ ५ जी (Redmi 12 5G) सह फोनच्या किमतीमध्ये कपात झाल्याचे दाखवलं आहे.

हेही वाचा…Apple आयपॅड पुन्हा होणार स्टेटस सिम्बॉल; मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, कंपनी ‘या’ दिवशी करणार घोषणा

तसेच लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि हेडफोन्सवर ७५ टक्के सवलत, तर टीव्ही आणि उपकरणांवर ६५ टक्के सूट मिळेल. सोनी डब्ल्यूएच – १००० एक्स एम ४ (Sony WH-1000XM4) वायरलेस हेडफोन्स, ॲमेझॉन ॲक्टिव्ह स्मार्टवॉच, ॲपल आयपॅड (10th Generation) वर सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांसाठी ७० टक्के आणि फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांसाठी ५० टक्के ते ८० टक्के सूट असेल. ॲमेझॉन इको (अलेक्सासह), फायर टीव्ही आणि किंडल (Kindle) डिव्हाइसेसवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तुम्हालादेखील अर्ध्या किमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, आयपॅड, टीव्ही खरेदी करायचा असल्यास तुम्ही या सेलमधून खरेदी करू शकता.