ॲपल कंपनीचे प्रॉडक्ट्स तरुण मंडळींना नेहमीच आकर्षित करतात. इतर कंपन्यांच्या तुलनेत जरी हे प्रॉडक्ट्स महाग असले तरी त्यामधील फीचर्सही जबरदस्त असतात. तर हे लक्षात घेता, ॲपल कंपनी कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांसाठी ‘बॅक टू स्कूल’ ऑफर घेऊन आली आहे. १५ जून २०२४ पासून शाळकरी व विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेजेस सुरू झाली आहेत. तर लॉकडाउननंतर गॅझेट्स शिक्षणासाठी आवश्यक साधने बनली आहेत. त्यामुळे कंपनी काही प्रॉडक्ट्सवर सूट देते आहे आणि ही ऑफर ॲपल बीकेसी (Apple BKC), ॲपल स्टोअर्स (Apple Saket stores), ॲपल स्टोअर ऑनलाइन (Apple Store online) २० जून ते ३० सप्टेंबरदरम्यान उपलब्ध असणार आहे.

‘बॅक टू स्कूल’मध्ये ॲपल कंपनी मॅक (Macs) आणि आयपॅड्स (iPads) ग्राहकांना खरेदी करण्यास अनुमती देते आहे. त्याव्यतिरिक्त जे मॅक खरेदी करतात, त्यांना एअरपॉड; तर जे आयपॅड खरेदी करतात, त्यांना ॲपल पेन्सिल मोफत देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना AppleCare Plus वर २० टक्के सूट देण्यात येईल. त्यांची उपकरणे संरक्षित असल्याची खात्री करून, त्याचबरोबर कंपनी ॲपल म्युझिक आणि ॲपल टीव्ही प्लसवर तीन महिने मोफत सबस्क्रिप्शन देते आहे. तसेच तीन महिन्यांनंतर विद्यार्थी दरमहा ५९ रुपयांच्या सवलतीच्या दराने त्यांचे सबस्क्रिप्शन सुरू ठेवू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple announced back to school offer college university students and teachers giving free airpods with mac apple pencil with ipad asp